Thursday, 17 March 2011

व्यवस्थापनाची कार्ये

व्यवस्थापन ही संकल्पना फार जुनी व व्यापक आहे.त्यामुळे या संक्ल्पनेत सातत्याने बद्ल होतात.
               एखादे कार्य व्यवहार किंवा चळ्वळ प्रभावी रितीने घडवून आणण्या्साठी आवश्यक असलेली कार्य ज्या यंत्रणेदवारे केली जातात त्या यंत्रणेस व्यवस्थपन म्हट्ले जाते.





व्याख्या
सससंघटित प्रयत्नांच्या मुळाशी असलेली एकात्म चलित स्वरुपाची मुलभूत रचना म्हणजे व्यवस्थापन होय.
         
१ नियोजन
२ संघट्न
३ समन्वय
४ संम्प्रेषण
५ दिग्दर्शन
६ अभिप्रेरण
७ नेतृत्व
८ नियंत्रन
९ कार्यवाही
१० मुल्यमापन

शालेय स्त्तरावरील आयसीटी समोरील आव्हाने

          आर्थिक समस्या
        खंडीत विजपुरवठा
        प्रशिक्षीत शिक्षकांची उणीव
        आ.सी.टी चे महत्व रुजवणे
  ५. नियंत्रीत जागेची व्यवस्था
  ६. अतिरिक्त विभाग
  ७. उदासिनता नष्ट करणे
  ८.  शासनाची उदासिनता
९. अतिरिक्त वेळेचे नियोजन


१ आर्थिक समस्या ;-
               सर्वच विद्यर्थ्याना संगणक घेता येणार नाही किंवा शाळेत संगणकांची संख्य कमी असल्याने प्रत्येक विधार्थ्याला संगणक शिकण्यसाठी खुप कमी वेळ मिळ्तो.

२ खंडीत विजपुरवठा;-
                 आज अपणाला सर्वत्र खंडीत विजपुरवठा दिसुन येतो

त्यामुळॆ यावर आपण उपाय करायला हवेत.हे एक मोठे आव्हाण आहे.
          प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव-
                          आज ही उच्चशिक्षित विद्यार्थी अथवा शिक्षकांना संगणकाचा वापर करता येत नाही. आ.सी टी. रुजवायची असेल तर आधी प्रशिक्षित शिक्षकांची भरती करावी लागेल
         आ.सी.टी.चे महत्व रुजवणे
                          विद्यार्थाना अगोदर आ.सी.टी. चे महत्व समजावून सांगणे त्यांना विश्वासात घेवून आ.सी.टी. बदद्ल अचुकता समजावून सांगणे.
         नियंत्रित जागेची व्यवस्था
                          शाळेत नियंत्रित जागेची व्यवस्था नसते. तसेच संगणकासाठी स्वतंत्र खोली नसते. ही एक मोठी समस्या आहे.
          अतिरिक्त नियंत्रन विभाग-
                       संगणक अथवा तंत्रज्ञानाची देखभाल करण्यासाठी अतिरीक्त कर्मचार्‍यांची भरती करावी लागेल.
         आ.सी.टी. बदद्ल उदासिनता नष्ट करणे.-
                                    एखादे काम चूकल्यानंतर वरीष्ठ अधिकारी कनिष्ठ कर्मचार्‍याना रागवतात त्यामुळे अनेकच्या मनात संगणक चालवताना चुका होतात की काय अशा प्रकारची भिती असते त्यामुळे आ.सी.टी.बदद्लची उदासिनता नष्ठ करणे गरजेचे आहे.

मूल्यमापनाची साधने

मूल्यमापन-
       उंची, वजन,किंवा काळ, त्याचपध्दतीने वेगवेगळ्या पध्दतीचे मापन आपण दैनंदिन व्यवहारामध्ये करत असतो. मूल्यमापन आणि मापन या दोन्ही संकल्पना आपण एकाच अर्थाने वापरत असलो तरी यामध्ये थोडासा फरक आढळून येतो.
            मापन हे संख्यात्मक स्वरुपाचे साधन होय. या संख्या र्निजीव असतात यांना अर्थ प्राप्त होतो तो मूल्यमापनाने.’

व्याख्या-
१.        दांडेकर
           शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली हे ठरविण्याची सूत्रबध्द पध्दत म्हणजे मूल्यमापन होय.
   २.पारसणिस
            शैक्षणिक उद्दिष्टे साध्य झाली याचे अवलोकन करणॆ म्हणजे मूल्यमापन होय.
     
मूल्यमापनाचे घटक

      मूल्यमापनामध्ये सामान्यत: तीन गोष्टींचा समावेश होतो.
                   १.शैक्षणिक उद्दिष्टे
                        २. शैक्षणिक अनुभव
                               ३.मूल्यमापनाची साधने
*मूल्यमापनाची साधने-                                        
       ठरविलेली उद्दिष्टे साध्य झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी व्यक्तीचे बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक अशा विविध क्षेत्रातील मापन करण्यासाठी मूल्यमापनाच्या विविध साधनांची आवश्यकता असते. ती साधने निर्दोष पद्धतीने वापरली तर व्यक्ती विकासाचे अचूक मापन होवू शकते.
      
मूल्यमापनाच्या साधनांचे प्रकार                १)संख्यात्मक साधने                     २) गुणात्मक साधने
  परिक्षा तंत्र                   १.निरीक्षणात्मक
१)तोंडी    २) लेखी   ३) प्रात्यक्षिक                    तंत्र
  * लेखी परिक्षा               २.आत्मनिरीक्ष
१. निबंधवजा प्रश्न      २. वस्तुनिष्ठ प्रश्न                  णात्मक तंत्र
   १) लघुत्तरी           १.व्दिपर्यायी                 ३.अविष्कार
   २) दिर्घोत्तरी          २.बहुपर्यायी                      तंत्र
                      ३.युग्मीकरण
                      ४श्रेष्ठ युग्मीकरण
                      ५.अन्योन्य संबंध
                      ६.अन्व्ययार्थ    
१) संख्यात्मक साधने-
        मूल्यमापणाच्या ज्या साधनांद्वारे विद्यार्थ्याच्या प्रगतीचे संख्यात्मक चित्र समजते, अशा साधनांना संख्यात्मक साधने म्हणतात.
·       परिक्षा तंत्र-
        शिक्षण क्षेत्रात परिक्षा तंत्राला फार महत्त्व आहे. शरीरावर जशी मज्जासंस्था नियंत्रण ठेवते त्याचप्रमाणॆ शिक्षण क्षेत्राचे विविध अवयव शिक्षक, पालक, विद्यार्थी इ. नियंत्रित ठेवण्याचे काम परिक्षा करते.
          तीन प्रकारे परिक्षा घॆतल्या जातात.
               १) तोंडी     २) लेखी    ३) प्रात्यक्षिक
१) लेखी परिक्षा-
       वि. जास्त असल्यास त्यांचे कमी कालावधीत मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने लेखी परिक्षा सोईस्कर असते.
       त्यांचे वर्गीकरण साधारणपणे
१.                  निबंधवजा प्रश्न
२.              वस्तुनिष्ठ प्रश्न    असे  करतात.
१)               निबंधवजा प्रश्न-
         या प्रश्नांचे उत्तर निबंधाप्रमाणे लिहायचे असते.
१.                  दिर्घोत्तरी प्रश्न -
        ज्या प्रश्नाचे उत्तर १५-२० ओळींत लिहावे अशी अपेक्षा असते.
    उदा. रक्ताभिसरणाची प्रक्रिया सविस्तर लिहा.
२.              लघुत्तरी प्रश्न
            ही दिर्घोत्तरी प्रश्नांचीच छोटी आवृत्ती असते. येथेही वि. मुक्त प्रतिसाद देतो. या प्रश्नांचे उत्तर साधारणत: ४-१० ओळींत लिहायचे असते.
            उदा. फुलराणी कवितेतील मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करा.
 
२)             वस्तुनिष्ठ प्रश्न
        वस्तुनिष्ठ प्रश्नाचे उत्तर निश्चित असे ठरलेले असते.उत्तर एका शब्दात, वाक्यात किंवा अंकात असते

१.      निरीक्षणत्मक तंत्र
२.    आत्मनिरीक्षणात्मक तंत्र
३.    अविष्कार तंत्र
४.    नामनिर्देशन तंत्र / समाजनिती तंत्र
१)      निरीक्षण तंत्र
           प्रमुख तीन प्रकार :
              १.पडताळा सूची
              २. पदनिश्चयन श्रेणी
              ३. प्रासंगिक नोंदी
एकंदरीत विद्यार्थी शिक्षकला कसा दिसतो? यावर आधारित अशाप्रकारचे मुल्यमापन केले जाते. शिक्षक विद्यार्थ्याचे शालेय आवारात वेगवेगळ्या प्रसंगी निरीक्षण करुन वि.चा. स्वभाव, कार्यपध्द्ती, वर्तन,सवयी,वृत्ती, कौशल्ये इ. बाबींशी संबंधीत अभिप्राय देत असतात.शिक्षकाचा हा अभिप्राय म्हणजेच विद्यार्थ्याचे केलेले मूल्यमापन होय.

२)आत्मनिरीक्षणात्मक तंत्र
             १.मुलाखत
             २.प्रश्नावली
             ३. अभिरुची शोधिका
             ४. व्यक्तिमत्त्व शोधिका
मुले स्वत:बद्दल काय म्हणतात? यावर आधारित हे मूल्यमापन आधारित असते. या प्रकारात विद्यार्थी स्वत:च स्वत:चे आत्मनिरीक्षण करुन उत्तरे देत असतो.

३)अविष्कार तंत्र
            १.चित्र काढणॆ
            २. बाहुल्यांचा खेळ
           ३. वाक्यपूर्ती
           ४. दैनंदिनी
  अशाप्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्याचे मूल्यमापन केले. जेंव्हा विद्यार्थी आत्मनिरीक्षण करण्य़ास असमर्थ असतात, तेंव्हा या तंत्राचा वापर करतात.

३)                समाजनिती तंत्र
             १.ओळखा पाहू
             २. समाजनिती आलेख
    यामध्ये वरील दोन प्रकारानुसार विद्यार्थ्याचे मूल्यमापन केले जाते. एखाद्या वि. ची. गटातील स्विकार्यता किंवा नकारावरुन श्रेणी ठरविली जाते.

      अशाप्रकारे विविध साधनांचा वापर करुन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते.